नागपूर ग्रामीण: नागपूरच्या स्वामीनारायण मंदिरात भक्तांचे पैसे उचलतांनाचा व्हिडिओ व्हायरल; जाब विचारणाऱ्याशी अरेरावी
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता नागपुरातूनही एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील वाठोडा परिसरातील सुप्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले पैसे उचलतांना एक नागरिक रंगेहात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे उपस्थित एका जागरूक नागरिकाने हा प्रकार पाहताच संबंधित व्यक्तीला तात्काळ जाब विचारला.