रामटेक: 17 वर्षीय अल्पवयीन अपहृत मुलीचा रामटेक पोलिसांनी घेतला शोध
Ramtek, Nagpur | Jun 19, 2026 पोलीस स्टेशन रामटेक येथे मागील 16 सप्टेंबर 2025 रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन अपहृत 17 वर्षीय मुलीचा शोध लावण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे. शुक्रवार दिनांक 21 जूनला गोपनीय माहितीच्या आधारे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मोठ्या कौशल्याने रामटेक पोलिसांनी त्या अपहृत मुलीचा शोध लावून आरोपी बादल दिलीप भागडकर वय 22 वर्षे राहणार सोनेगाव ता. पारशिवनी याला मौजा बोरीमजर तालुका उमरेड येथून ताब्यात घेतले.