रोहा: प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेल-सुभेदारगंज दरम्यान ३ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
Roha, Raigad | May 21, 2026 उन्हाळी हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते सुभेदारगंज दरम्यान ३ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचा लाभ रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०४१०४ पनवेल-सुभेदारगंज साप्ताहिक विशेष ही गाडी गुरुवार, दि. २१ मे २०२६ आणि दि. २८ मे २०२६ रोजी पनवेल येथून दुपारी ३:२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:०० वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल.