अमरावती: साईनगर मधील ऑक्सिजन पार्क जवळ नाट्यगृह निर्माण करण्यासाठी मंत्रालयात मिटिंग, तुषार भारतीय यांच्या पत्राची दखल
साईनगर मधील ऑक्सिजन पार्क जवळ नाट्यगृह निर्माण करण्यासाठी माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर त्या पत्रावर सांस्कृतिक मंत्री मा ना आशिषजी शेलार यांनी मंत्रालयात मिटिंग करुन तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. प्रस्ताव सादर करण्यासाठी महानगरपालिका मध्ये आयुक्त सौम्या शर्मा चांडक याच्यासह माजी महापौर चेतन गावंडे,अमरावती जिल्हा नाट्यपरिषदेचे श्री.एड चंद्रकांत डोरले, श्री.प्रसाद खरे, मंदार नानोटी शहर अभियंता श्री रवींद्र पवार, आदींची उपस्थिती होती