जालना: जालना पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि दोन तलवारींसह तिघे ताब्यात
Jalna, Jalna | Aug 20, 2026 जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एक गावठी पिस्तूल, एक देशी रिव्हॉल्व्हर आणि दोन धारदार तलवारी असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. गुरुवार दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणार्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.