रामटेक: रामटेक - चिचाळा मार्गातील पेंच नहरावरील पूल झुकल्याने वाहतूक ठप्प
Ramtek, Nagpur | Apr 30, 2026 रामटेक -चिचाळा मार्गावर असलेल्या पेंच डाव्या कालव्यावर असलेला पूल जिर्ण अवस्थेत असून तो झुकला असल्याने या मार्गावरील वाहतूक मागील आठ महिन्यांपासून ठप्प आहे, या पुलाला भेगा पडून गंभीर तांत्रिक अडचणी वाढल्यानंतर पेंच सिंचन उपविभाग रामटेकने या पुलाला दोन्ही बाजूने बेरिकेट लावून मार्ग वाहतुकीस बंद केला आहे.