जालना: नसाडगाव-घोडेगाव रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास; खड्डे, दगड आणि साचलेल्या पाण्यामुळे सर्वांचेच हाल
Jalna, Jalna | Sep 6, 2026 जालना तालुक्यातील नसाडगाव आणि घोडेगाव या गावांना जोडणार्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले दगड आणि पावसाचे साचलेले पाणी यामुळे वाहनधारकांसह पादचार्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रविवार दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते.