अंबड: 22 वाळू माफिया विरोधात गोंदी पोलिसात तक्रार दाखल मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांची माहिती
Ambad, Jalna | Jun 21, 2025 गोदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून 500ब्रास वाळूचे उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केल्या प्रकरणी गोंदी पोलिसात महसूलचे मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या तक्रारी वरून 22वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन तडीपार वाळू माफियांचे समावेश आहे.