जागतिक पर्यावरण दिनी वटवृक्ष लागवड; सेवानिवृत्त RFO यांचा प्रेरणादायी उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Deulgaon Raja येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सेवानिवृत्त आरएफओ Jagnnath Doifode यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड केली.
महावीर स्तंभाजवळ नगरपालिकेने फायबरचे कृत्रिम वटवृक्ष उभारलेले असताना, पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढ्यांना नैसर्गिक सावली मिळावी या उद्देशाने खऱ्या वटवृक्षाची लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला.
या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल कायंदे आणि वनरक्षक वायाळ यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे लागवड केलेल्या वटवृक्षाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारीही डोईफोडे यांनी स्वतः स्वीकारली आहे.
त्यांच्या या पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
📍 ठिकाण : Deulgaon Raja
#WorldEnviron