धुळे: लग्नाचे उमेश दाखवून दिव्यांग तरुणीवर अत्याचार, दोन जणांविरुद्ध महाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 5, 2024 धुळे शहरापासून जवळ असलेल्या एका गावात २५ वर्षीय दिव्यांग तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप याने तरुणीला लग्न करून सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. शिवाय वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. यानंतर आता तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यावर संदीप याने नकार दिला. तसेच संदीपच्या आईने देखील या संदर्भात शिवीगाळ करत दमदाटी केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे