हिंगणा: एमआयडीसी रोड बॉम्बे हॉटेलच्या गल्लीत हद्दपार व्यक्तीस घातक शस्त्रासह अटक.
Hingna, Nagpur | Mar 18, 2026 एम.आय.डी.सी. पोलीसांचे तपास पथक पेट्रोलींग करीत असता, सेंन्ट्रल एम.आय.डी.सी. रोडवर, बॉम्बेवाला हॉटेलच्या गल्लीत, अंधारात एक ईसम एका दुचाकी वाहनावर संशयीत हालचाली करतांना दिसून आला. त्यास हटकले असता, तो पोलीसांना पाहुन पळून जात असता, त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याचे नाव सुशिल उर्फ कोमा उत्तम वाघमारे, वय २१ वर्षे, रा. भांडेप्लॉट असे सांगितले.त्यास अटक करण्यात आलेलं आहे पुढील तपास सुरू आहे.