रामटेक: बस आगार रामटेक च्या सेवेत आता 3 नवीन राजमाता जिजाऊ बसेस
Ramtek, Nagpur | Apr 29, 2026 बसेसची घटती संख्या व प्रवाशांची वाढती संख्या यामुळे रामटेक आगाराचे शेड्युल कमालीचे बिघडले होते. प्रवाशांची गैरसोय होत होती.. अशातच रामटेक आगाराला बसेसची अत्यंत आवश्यकता होती. बुधवार दिनांक 29 एप्रिलला रामटेक आगारात तीन नवीन राजमाता जिजाऊ बसेस आल्या अन आगार कर्मचारी,चालक,वाहक यांच्यासह प्रवाशांतही आनंद व्यक्त करण्यात आला.