नागपूर शहर: ११२ नंबरची जादू; ३ मिनिटांत पोहोचत अजनी पोलिसांकडून तरुणाचे वाचविले प्राण
नागपूरमधील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर परिसरात ११२ क्रमांकाच्या इमर्जन्सी कॉलवर तत्परता दाखवत पोलिसांनी अवघ्या ३ मिनिटांत घटनास्थळ गाठले आणि चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या शहबाज अजीम खान या नशेत असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे मुकुल धापोडे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. ११२ वर माहिती मिळताच अजनी पोलिसांच्या बीट मार्शलने ३ मिनिटांत घटनास्थळ गाठले.