रामटेक: कालिदास स्मारक रामटेक परिसरात बिबटचे दर्शन; श्रद्धाळू, पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
Ramtek, Nagpur | Jul 16, 2026 कालिदास स्मारक रामटेक परिसरात मागील दोन दिवसांपासून बिबटचा वावर असल्याने श्रद्धाळू, पर्यटक तसेच सकाळी,सायंकाळी फिरायला जाणाऱ्या रामटेकवासीयात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात काही लोकांना बिबटचे दर्शन झाले. याची माहिती वनविभाग रामटेक यांना देण्यात आल्यानंतर बुधवारला सायंकाळी व गुरुवारच्या सकाळी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे यांनी दिली आहे