महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव .पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर आता जालन्यातली घटना समोर आली .दररोज महिला अत्याचार व अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना यासमोर येत आहे महाराष्ट्रातील महिलांना मुलींना सुरक्षित वातावरण मिळत नाही. अशी माहिती आज दिनांक 5 जुलै रोजी दुपारी चार वाजता आदर्श नगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली.