नरखेड: नरखेड पोलिसांची कारवाई: सुगंधी तंबाखूसह तरुण अटकेत
नरखेड पोलिसांनी सावरगाव ते काटोल रोडवर नाकाबंदी दरम्यान ३५.४२५ किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि एक दुचाकी जप्त केली आहे. एकूण ६२,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मयूर शंकरलाल सचदेव (वय २७, रा. वर्धा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.