पुर्णा: धनगर टाकळी शिवारात अवैध रेती उपसा करणारे इंजिन तराफे आदी दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल
धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांच्या विशेष पथकातील पीएसआय डुकरे, पोलीस जमादार रामेश्वर खेत्री,शारेख , ससाणे यांच्या पथकाने धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा मारला असता. अवैधरित्या वाळू उपसा करणारे इंजिन तराफे आदी दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई शुक्रवार 4 जुलै रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.