रामटेक: म.फुले वार्ड, रामटेक येथील नागारा तलावाच्या किनाऱ्यावर बांबूचे झुडूप बनले धोकादायक
Ramtek, Nagpur | Jul 4, 2026 रामटेक शहरातील म. फुले वार्ड रामटेक अंतर्गत गांधी चौक- राखी तलाव चौक मार्गावरील श्री पोपळी श्री चौरसिया श्री चुन्ने यांच्या घरामागे बांबूची मोठी झुडपे वाढली आहेत. इतर झाडे ही दाटीवाटीने वाढली आहेत. या झाडातून 11 केव्ही हाय टेन्शन लाईन गेली आहे. या लाईनवर ही झाडे झुडपे आहेत. त्यामुळे या लाईनवर वारंवार स्पार्क होने नित्याचीच बाब झाली आहे. यातच शुक्रवार- शनिवारच्या मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान जोरदार स्पार्क होऊन विद्दूत पुरवठा बंद झाला होता.