कळमेश्वर: नर्सरी मालकांसाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा- डॉ आमदार आशिष देशमुख
विदर्भामध्ये संत्री व मोसंबी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकरी मोठ्या आशेने फळबागांची लागवड करतात. मात्र, नर्सरीतून घेतलेले रोप निकृष्ट दर्जाचे निघाल्यास, अथवा लागवडीनंतर पाच-पाच वर्षे उलटूनही त्याला फळ येत नसेल, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.सरकारला माझी नम्र विनंती आहे की, हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर विचारविनिमय करून नर्सरी मालकांसाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा व शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.