नरखेड: जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर कारवाई, २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
Narkhed, Nagpur | Apr 20, 2026 नरखेड पोलिसांनी खाटीकपुरा परिसरात छापा टाकून ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ९ आरोपींना रंगेहात पकडले.पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते, ६ मोबाईल, २ मोटारसायकल आणि रोख रकमेसह एकूण २,७०,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध नरखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.