परतूर: शेवगा ते बामणी रस्त्याची दुरुस्ती करा,उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ग्रामस्थांचे निवेदन
Partur, Jalna | Aug 8, 2026 आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील शेवगा व बामणी येथील ग्रामस्थानी व मराठा समाज बांधवांनी एकत्र येत उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की, मागील काही दिवसांपासून तालुक्यातील शेवगा ते बामणी या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.