रामटेक: पो. स्टे.रामटेक अंतर्गत दाखल सदोष मनुष्यवध (हिट अँड रन )प्रकरणातील सर्व तिन्ही आरोपी अटकेत
Ramtek, Nagpur | May 22, 2026 गुरुवार दिनांक 21 मे च्या रात्री साडेबारा वाजता च्या दरम्यान रामटेक शहराच्या पूर्वी सीमेवरील श्री नरेंद्र तिडके कॉलेज समोर रामटेक -तुमसर रोड येथे झायलो क्रमांक एम एच 14 डी एन 26 32 च्या चालकाने सर्विस रोडवरील सलून दुकानाचे ठेवलेला जोरदार धडक दिली. या वाहनाच्या धडकेत सलून ठेवल्याजवळ झोपलेला वेडसर अनोळखी इसमाचा चिरडून जागीच अंत झाला होता. या घटनेतील वाहन चालकासह अन्य दोन साथीदारांना नागपूर शहरातून 22 मे च्या दिवशी रामटेक पोलिसांनी ताब्यात घेतले.