जालना: जालना शहरात मोटारसायकलचे सुटे भाग काढताना दोघांना पकडले; 45 हजारांची दुचाकी जप्त; सदर बाजार पोलीसांची कारवाई
Jalna, Jalna | Sep 10, 2026 जालना शहरातील कन्या प्रशाळेच्या पाठीमागील बाजूस अंधारात मोटारसायकलचे सुटे भाग काढत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे आढळून आलेली सुमारे 45 हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. आदित्य आनंद नवगिरे (वय 22, रा. क्रांतीनगर, जालना) आणि जय अशोक उदावंत (वय 23, रा. सुवर्णकारनगर, जालना) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.