रोहा: पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर रात्रीची गस्त
Roha, Raigad | Jun 7, 2026 कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने प्रत्यक्ष रुळावर रात्रीची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरडींच्या धोकादायक क्षेत्रात 24 तास पहारेकरी (वॉचमन) तैनात ठेवण्यात येणार आहेत. नाईट पेट्रोलिंग ड्युटीवर असणारे कर्मचारी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्यांना नेमून दिलेल्या भागात पायी गस्त घालतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.