अमरावती: रहाटगाव परिसरातील नॅशनल हायवेवर भरधाव कार ने नीलगाईला दिली धडक, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रहाटगाव परिसरातील मंदिरालगत नॅशनल हायवेवर भरधाव क्रेटा नामक कारने निलगायीला जोरदार धडक दिली.या अपघातात निलगायीचा जागीचा मृत्यू झाला, तर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या अपघाताची माहिती नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे सीआर मोबाईल वाहनातील कर्मचाऱ्यांनी कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आल्यावर पुढील कारवाई करण्यात आली.