रामटेक: कृषी सहाय्यक कपिल कुमार वैद्य, तिरोडा लापता ; पोलिसांनी जारी केली शोध पत्रिका
Ramtek, Nagpur | May 14, 2026 दोन दिवसाआधी परसवाडा येथे जाऊन आईच्या प्रकृतीची विचारपूस करून परत आपल्या गावी तिरोडा येथे आलेले कृषी सहाय्यक पदावर कार्यरत कपिल कुमार वैद्य हे अकरा मे च्या सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान दाढी करून येतो असे सांगून घरून निघून गेले. मात्र ते अद्यापही परत न आल्याने पत्नी अनिता वैद्य यांनी तिरोडा येथे तक्रार नोंदवली. तिरोडा व रामटेक परिसरात त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत आहे.