सेनगाव: पार्डी पोहकर ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सर्जेराव खंदारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कार्यक्रम आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात आला.