अक्कलकुवा: बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेचा ८ किलोमीटर जीवघेणा प्रवास, केवडी गावातील घटना #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातील गर्भवती महिला सोतीबाई कालूसिंग तडवी यांना अचानक वेदना जाणू लागल्या. त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता अभावी ॲम्बुलन्स उपलब्ध नव्हती. अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मुख्य रस्त्यापर्यंत आठ किलोमीटरची पायपीट करत गर्भवती महिलेला ॲम्बुलन्स च्या माध्यमातून रुग्णालयात पोहोचविले आहे. आता नवजात बालकाची आणि मातेची प्रकृती स्थिर आहे. रस्ता अभावी आदिवासी बांधवांना आजही मरत यातना सोसावे लागत आहे.