अक्कलकुवा: बिलगाव ते सावऱ्यादिगर आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वकांशी प्रयोग,ड्रोनद्वारे होणार मेडिसिन पुरवठा
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेला आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता अभावी अनेक रुग्ण दगावतात त्यांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. यासाठी जिल्हा प्रशासनानं अन मुंबई आयटीच्या माध्यमातून एक महत्त्वकांक्षी प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ड्रोन द्वारे आता सातपुड्यात बिलगाव ते सावऱ्यादिगर आरोग्य यंत्रणेला ड्रोन द्वारे मेडिसिन पुरवठा केला जाणार आहे.