अक्कलकुवा: अक्कलकुवा शहरात नागरिकांनी आकाशात आज अद्भुत नजारा बघितला, सूर्याभोवती चमकदार पांढर वर्तुळ
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील नागरिकांनी आज दुपारी बाराच्या सुमारास आकाशात अद्भुत नजारा बघितला. सूर्याभोवती चमकदार असं पांढर वर्तुळ निर्माण झालं होतं. याला सूर्य कडे अथवा सन हॅलो म्हणतात. ही केवळ एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश जातो. तेव्हा सूर्याभोवती असं रिंगण तयार होतं. हे मनमोहक दृश्य केवळ एक खगोल शास्त्रीय चमत्कार आहे.