भिवापूर: अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 2 एप्रिल रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सेलोटी शिवारात नाकाबंदी केली असता एक ट्रॅक्टर एमएच ३६ एल १८४७ आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली मिळून आल्याने वाहन थांबून वाहनाची तपासणी केली असता वाहन चालक ज्ञानेश्वर गोपीचंद लेकुरवाडे व वाहन मालक राहुल रामाजी देंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला