मंठा: एकाच घरातून तीन डॉक्टर! हेलस गावाची तिहेरी कमाल; जिद्दीने घडवला इतिहास..
Mantha, Jalna | Apr 11, 2026 एकाच घरातून तीन डॉक्टर! हेलस गावाची तिहेरी कमाल; जिद्दीने घडवला इतिहास.. आज दिनांक 11 शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हेलस या छोट्याशा गावाने मोठी अभिमानास्पद झेप घेतली आहे. एका साध्या कुटुंबातील तीन भावंडांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत एकाच दिवशी ‘डॉक्टर’ होण्याचा मान मिळवला—आणि गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. डॉ. सोनाली खराबे-बोराडे, डॉ. शुभम खराबे आणि डॉ. पूनम खराबे या तिघांचा कॉन्वोकेशन सोहळा एकाच दिवशी पार पडला