ताडी की केमिकलचा डोस? पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक ताडीच्या नावाखाली मृत्यूचा खेळ!
फुगेवाडी परिसरात झालेल्या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या मोठ्या घटनेनंतरही अवैध आणि रासायनिक मद्यविक्री करणाऱ्यांवर कोणतीही जरब बसलेली नाही, हेच या प्रकारावरून स्पष्ट होते.
शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, सरकारी मान्यताप्राप्त ताडी विक्री केंद्रांवरच सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या केंद्रांवर 'नैसर्गिक ताडी'च्या नावाखाली सर्रासपणे घातक रसायनयुक्त ताडीची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. काही काळापूर्वीच फुगेवाडी येथे झालेल्या भीषण विषारी दारू दुर्घटनेची जखम अजूनही ताजी असताना, शहरात पुन्हा एकदा हाच जीवघेणा प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
#pimprichinchwad #munde #update #news #maharastra
Haveli, Pune | Jul 6, 2026