बिहारमधील किशनगंजच्या चुडीपट्टी परिसरात तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, इमारतीतील दुकानात ज्वलनशील साहित्य ठेवण्यात आले होते, तसेच गॅस सिलिंडर असल्याचाही दावा केला जात आहे. आग लागल्यानंतर तब्बल अर्धा तास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असून, संपूर्ण बाजारपेठ आणि नर्सिंग होम परिसरात एकच गोंधळाचे वातावरण आहे.
#BiharNews #Kishanganj #FireIncident #BreakingNews #ViralNews
Pune City, Pune | Sep 14, 2026