वणी: कौटुंबिक वादातून लोखंडी रॉडने मारहाण; महिला गंभीर जखमी, राजुर कॉलरी येथील घटना शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jan 18, 2026 वणी तालुक्यातील राजूर कॉलरी परिसरात कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सायंकाळी घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिचा डावा हात फॅक्चर झाला आहे.