रामटेक: पो. अधीक्षक नाग. ग्रा. यांनी चारगाव पेंच येथील मार्वल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली द्वारे लावलेल्या कॅमेऱ्याची केली पाहणी
Ramtek, Nagpur | Jun 11, 2026 महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर इन्हान्स्ड ला इन्फॉरसमेंट (मार्वल) ने विदर्भातील वनक्षेत्राच्या भागांमध्ये एआय सक्षम देखरेख कँमेरे बसविले आहेत. त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 11 जूनला वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री हर्ष ए. पोद्दार यांनी पोलीस स्टेशन देवलापार हद्दीतील चारगाव पेंच येथे लावलेल्या एआय सक्षम देखरेख कॅमेऱ्याची पाहणी केली.