पुणे, इंदापूर आणि जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत सहा खेळाडूंनी पदके पटकावली. १५ वर्षे, १७ वर्षे आणि २० वर्षाखालील गटात खेळाडूंनी ही कामगिरी केली असून जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेत हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या यशाबद्दल पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना रोख बक्षिसे दिली.