धाराशिव शहराजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाची चारचाकीला धडक
धाराशिव शहराजवळ आज एचपी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाने चारचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. सर्व्हिस रोडवरून आलेल्या गॅस वाहनाने अचानक हायवेवर प्रवेश केल्याने हा अपघात झाला. या धडकेत चारचाकीच्या बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात घासला गेला. चारचाकीमध्ये सात ते आठ प्रवासी होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. मात्र, सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
#dharashiv #solapur #highways #accident #LatestNews
Dharashiv, Dharavshiv | Aug 18, 2026