नागपूर शहर: थरारक! नागपूरमधील गोधनी येथे मध्यरात्री क्लोरिन गॅस गळती, 40 नागरिक रुग्णालयात
नागपूरमधील गोधनी नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या फागुजी नगरमधील वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या रिझर्व्ह क्लोरिन सिलिंडरमधून मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक गॅस गळती झाली.प्लांटला लागूनच मोठ्या वसाहती असल्याने विषारी वायू घरांमध्ये शिरला. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली. या घटनेत तब्बल ४० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर ३ रुग्ण ज्यात एका बालकाचा समावेश आहे आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.