रामटेक: रामटेक शहरासह ग्रामीण क्षेत्रात हनुमान जयंतीचा उत्साह
Ramtek, Nagpur | Apr 2, 2026 हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर गुरुवार दिनांक 2 एप्रिलला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत रामटेक शहरासह ग्रामीण भागातील हनुमान मंदिरात मोठा उत्साह दिसून आला. सर्वच हनुमान मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, पूजा पाठ, अर्चना, आरती नंतर प्रसाद, महाप्रसाद वितरित करण्यात आले.