रोहा: पाणीपट्टी दरवाढीवरुन रोह्यात संघर्ष तीव
Roha, Raigad | Jun 24, 2026 रोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले. सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोप करत वाढीव दर तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चर्चे नंतरही तोडगा न निघाल्याने शहरप्रमुख राजेश काफरे यांच्यासह शिवसैनिक उपोषणावर ठाम राहिले आहेत.