जालना: सोलार प्लेट चोरीचा गुन्हा उघड; कदीम जालना पोलिसांची दमदार कामगिरी
दोन आरोपी अटकेत; 34 सोलार पॅनलसह 4 लाख 83 हजार 200 रु
Jalna, Jalna | Aug 13, 2026 सोलार प्लेट चोरीचा गुन्हा उघड; कदीम जालना पोलिसांची दमदार कामगिरी दोन आरोपी अटकेत; 34 सोलार पॅनलसह 4 लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आज दिनांक 13 गुरुवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पॅन पंप वेअर हाऊसच्या गोडाऊनमध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला 4 लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.