नाशिक: काळाच्या पंजातून’ नाटकाद्वारे शिवकालीन शौर्यगाथा जिवंत
Nashik, Nashik | Nov 27, 2025 छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील दुर्लक्षित पण अत्यंत रोमहर्षक अध्याय उलगडणारे ‘काळाच्या पंजातून’ हे ऐतिहासिक नाटक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादर करण्यात आले. नेताजी/दादा भईर लिखित आणि करण सुरेश भईर दिग्दर्शित या नाटकाने शिवकालीन गुप्तहेरयंत्रणा, रणनीती आणि मोगल सत्तेविरुद्धच्या संघर्षाची प्रभावी पुनर्मांडणी केली.नाटकातील ‘आग्रा सुटका उल्लेखनीय मोहिमेतील प्रसंग प्रेक्षकांना शिवरायांच्या धाडसी व दूरदर्शी नेतृत्वाची झलक देऊन गेले.