रोहा: खरिपाच्या तोंडावर रोह्यात खतांचा काळाबाजार
Roha, Raigad | Jun 18, 2026 रोहा शहरातील 'शेतकरी कृषी सेवा केंद्र' या दुकानातून शासकीय अनुदानावर आलेला लाखो रुपयांचा खतसाठा गायब करून त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खत नियंत्रण आदेश १९८५ आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन करून ३,५४,५१३ रुपये किमतीचा खतसाठा काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या या धाडसी कारवाईमुळे रोहा परिसरातील खत माफियांचे धाबे दणाणले आहेत.