SIR विरोधात मनसेचा एल्गार; राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना
SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी डोंबिवलीतून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. हातात ‘SIR रद्द करा’चे फलक आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मनसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला .यावेळी राजू पाटील यांनी जनतेच्या मताचा अपमान झाल्याचा आरोप करत सर्व मतदारांनी याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन केले. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी अनेक पत्रे दिली असून त्यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या आधारे निवडणुका झाल्या असतील तर त्या रद्द करून नव्याने घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मतदारसंघात २ लाख ५५ हजार मतांची न�
Kalyan, Thane | Oct 4, 2026