आज दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान महानगरपालिका येथे नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात सध्या सुरू असलेले फुल मार्केट तात्काळ स्थलांतरित करावे, या मागणीसाठी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या फुल मार्केटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, कचऱ्याचे साम्राज्य वाढल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. या संदर्भात आज स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले.