नागपूर ग्रामीण: विवाह व घर खरेदीचे आमिष दाखवून ५३ वर्षीय विधवेवर बलात्कार; ३ लाखांची फसवणूक; मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत ५३ वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याची व ३ लाख रुपये उकळल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपी राजेश विश्वकर्मा याने पीडितेला नागपूर येथे राहण्याची व्यवस्था करून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्यानंतर लग्नाचे व घर खरेदीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि वारंवार पैसे उकळले. पैसे उकळल्यानंतर आरोपी फरार झाला असून, मानकापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.