जागतिक डास दिवस (World Mosquito Day) दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पाळला जातो.
1.9k views | Gondia, Maharashtra | Aug 20, 2026 जागतिक डास दिवस (World Mosquito Day) दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पाळला जातो. डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यांसारख्या आजारांबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 🦟 यंदाचा संदेश “डासांचा प्रादुर्भाव रोखा, आजारांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करा!” घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करा. ताप, थंडी वाजणे किंवा अंगदुखी असल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करा. सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया 🦟🩺