धुळे: बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी करण्याबाहेर निदर्शने
Dhule, Dhule | Aug 23, 2024 राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. बंगालपासून बदलापूरर्यंत महिला सुरक्षित नाहीत. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली. पालक शाळा प्रशासन आणि पोलिसांना कारवाईची विनंती करत होते, मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नाही. या अत्याचारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहे.