धुळे: जानकी नगर परिसरात श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे शहरातील जानकीराम नगरात नव्याने उभारलेल्या श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवतपणे पार पडला. या निमित्त 18 जोडप्यांची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भव्य मूर्ती मिरवणूक काढण्यात आली, तर पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलश यात्रा, गणपती पूजा, मातृका पूजन, होम, हवन, मुर्ती प्राणप्रतिष्ठा अशा अनेक विधींचा समावेश होता.